सर्व दुनियेला ‘तेरा’ ह्या आकड्याची भीती का?


ह्या जगामध्ये अश्या अनेक गोष्टी, अनेक मान्यता अश्या आहेत, ज्या अस्तित्वात कशा आल्या ते कोणी नेमके सांगू शकणार नाही. ह्या मान्यता प्राचीन काळामधे रूढ झाल्या असल्या तरी लोकांच्या मनामध्ये त्या मान्यतांचे भय आजही आहे. अश्या ह्या मान्यतांमध्ये एक आहे, ‘तेरा’ हा आकडा. ह्या आकड्याबद्दल अनेकांचा मनामध्ये भय असते. अनेक ठिकाणी हा आकडा शुभ मानला जातो. विशेषतः जर एखाद्या शुक्रवारी तेरा तारीख आली, तर हा दिवस खास अशुभ समजला जातो. ह्या दिवशी लोक कोणतेही नवे काम काती घेत नाहीत, तसेच हा दिवस कोणत्या तरी अशुभ घटनेला कारणीभूत ठरत असल्याची मान्यता अनेक ठिकाणी रूढ आहे.

मनोवैज्ञानिकांच्या मते तेरा ह्या आकड्याचे भय वाटणे हे एक मानसिक व्याधी आहे, ह्याला ट्रीस्कायडेकाफोबिया, किंवा थर्टीन डीजीट फोबिया असे म्हटले जाते. ह्या व्याधीचा रुग्णाच्या मनावर इतका जबरदस्त पगडा असतो, की तेरा ह्या आकड्याशी संबंधित कोणतेही काम करण्यास ह्या व्यक्ती तयार होत नाहीत. काही ठिकाणी तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बाराव्या मजल्यावरील मजल्याला तेरा हा आकडा न देता, तो वगळून चौदा हा आकडा दिला जातो. तसेच तेरा तारखेला अशुभ घटना घडत असल्याचाही अनेक लोकांचा विश्वास आहे.

अनेक न्यूमेरॉलॉजिस्टच्या मते तेरा हा आकडा अशुभ फल देणारा आहे. बारा हा आकडा पूर्णत्वाचे प्रतीक असून, त्यामध्ये एक मिळविल्यानंतर येणारा तेरा हा आकडा मात्र अशुभ असल्याचे ह्या तज्ञ मंडळींचे मत आहे. ब्रिटनमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये तेरा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करावयाची असली, तरी त्या ठिकाणी चौदा खुर्च्या मांडल्या जातात. चौदाव्या खुर्चीवर कॅस्पर नामक मांजरीची मूर्ती ठेवली जाते.

Leave a Comment