देशात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे होणार लसीकरण


नवी दिल्ली – कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात राजधानी दिल्लीमधील ५१ लाख लोकांना दिली जाणार आहे. जवळपास एक हजार लसीकरणाचे केंद्र यासाठी तयार केले जाणार आहेत. ही केंद्र दिल्लीतील ४८ सरकारी आणि १०० खासगी रुग्णालयात तयार केली जातील. कोल्ड चेनची व्यवस्था लसीकरण केंद्रावर असेल. यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील. दिल्लीत लसीकरणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६०० आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५०० लोकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शासकीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या खासगी रुग्णालयांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांचे लसीकरण केली जाणार आहेत. प्राधिकरणाकडून एसएमएसद्वारे अशा लोकांना माहिती मिळेल, ज्यामध्ये बूथ आणि वेळेचा उल्लेख असेल. लसीकरण कार्यक्रम, कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कम्युनिटी मेडिसिनचे संचालक डॉ. सुनीला गर्ग याबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व ५१ लाख लोकांचे लसीकरण मोफत केले जाईल. डॉ. गर्ग म्हणाले, सर्व बूथवर लसींची तपासणी सरकारी अधिकारी करतील.

लसीकरण केंद्रे शहरातील अनेक ठिकाणी बांधली जातील. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही प्रक्रिया सुरू होईल. कोल्ड चेन ३ हजार कर्मचाऱ्यांसह लोकनायक रुग्णालयात तयारी केली असून तेथे ५ लसीकरण केंद्रे असण्याची शक्यता आहे. काही मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही अनेक लसीकरण केंद्रे असतील.

प्रत्येक बूथवर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ काळात सुमारे १०० लसींचे डोस दिले जातील. प्रत्येक बूथमध्ये ३ खोल्या असतील. यापैकी एकीकडे आधार कार्डसह इतर ओळखपत्रांवर आधारित पडताळणी असेल. दुसर्‍या क्रमांकावर लसीचे डोस दिले जातील आणि लस दिल्यानंतर तिसऱ्या खोलीत सुमारे अर्धा तास ठेवले जाईल. २८ दिवस परिक्षण केल्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

३ लाख आरोग्यसेवा कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन कामगार आणि ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या किंवा इतर कोणत्याही गंभीर आजार असलेल्या २ लाख लोकांना कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. एका अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार ज्याला आपले नाव नोंदणी करून घेण्याची आवश्यकता असेल त्याने जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.