दररोज पाच बदाम खा आणि फरक बघा…


बदाम खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी असते हे आपल्याला माहीतच आहे. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या मुळे केस, त्वचा आणि त्वचा निरोगी राहतातच, पण त्या शिवाय स्मरणशक्ती उत्तम राहावी या करिताही बदामाचे सेवन केले जाते. हे ज्ञान आपणा सर्वांना असले, तर वास्तवात बदाम कितीदा नियमित खाल्ले जातात हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

दररोज चार ते पाच बदामांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ताकद, जीवनसत्वे, क्षार, आणि प्रथिनांच्या रूपाने मिळत असते. वजनावर नियंत्रण ठेवण्यापासून ते शरीरातील अशक्तपणा दूर करण्याची क्षमता बदामात असते. हृदयरोग असणाऱ्यांकरिताही बदामाचे सेवन लाभकारी आहे. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी थोड्या पाण्यामध्ये बदाम भिजत घालावेत व सकाळी उठून ते बदाम खावेत. दररोज अश्या रीतीने बदाम खाल्ल्यानंतर होणारे फायदे आपल्याला अनेक बाबतीत जाणवतील असे आहारतज्ञांचे मत आहे.

बदामाच्या नियमित सेवनाने नैराश्य दूर होऊन, मनस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. तसेच बदमातील फायबर, प्रथिने आणि मॅग्नेशियम शरीराला लाभकारी आहे. विशेषतः मधुमेहींना याचा खास लाभ होतो. बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत होते. तसेच यामधील कॅल्शियम, फॉसफोरस आणि इतर पोषक तत्वांमुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बदाम लाभकारी आहेत.

ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज चार ते पाच बदामाचे सेवन करावे. बदामाच्या सेवनाने भूक शमते व वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत नाही. तसेच बदामाच्या सेवनाने त्वचा नितळ आणि सुंदर राहण्यास मदत होते. यामध्ये इ जीवनसत्व प्रचुर मात्रेमध्ये असल्याने बदाम केस आणि नखे यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. बदामाच्या सेवनामुळे बद्धकोष्टही दूर होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment