ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण


ब्रिटन – कोरोनाच्या नव्या प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळला असून त्या नव्या स्ट्रेनचा फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अनेक देशांसाठी वेगाने संसर्ग होणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंतेची बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील वाहतुकीवर ५० हून अधिक देशांनी निर्बंध आणले आहेत. यासंदर्भातील वृत्त एएफपीने दिले आहे.

दरम्यान फ्रान्समध्ये सापडलेला हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये वास्तव्यास होता. तो लंडन येथून १९ डिसेंबरला परतला होता. कोणतीही लक्षणे या रुग्णामध्ये दिसत नसून तो फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. त्याची २१ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोरोनाच्या नव्या विषाणूंची लागण झाल्याचे समोर आले. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी फ्रान्समध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात केली आहे. यावेळी कोणामध्ये लक्षणे आढळली तर त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे.