पायांच्या दुखण्यावर नैसर्गिक उपायांनी करा मात


दिवसभराची धावपळ आणि कामाचा थकवा, यामुळे अनेकदा पाय दुखू लागतात. कधी कधी हे दुखणे इतके बळावते, की रात्री झोप लागणे ही मुश्कील होऊन बसते. अश्या वेळी एखादी वेदनाशामक गोळी घेणे, किंवा पायांना एखाद्या वेदनाशामक क्रीमने मसाज करणे यांसारखे उपाय आपण अवलंबत असतो. पण पायांचे दुखणे कमी करण्यासाठी आपल्याला अनेक सोप्या आणि संपूर्णपणे नैसर्गिक उपायांचा अवलंबही करता येऊ शकेल. यामुळे कोणतेही दुष्परिणाम उद्भविणार नाहीतच, शिवाय पायांचे दुखणेही नक्कीच कमी होईल.

जर पायांचे दुखणे वारंवार उद्भवत असेल, तर बर्फाने शेक घेतल्याने आराम मिळेल. मात्र बर्फ थेट पायांवर न लावता, एखाद्या कपड्यामध्ये लपेटून मगच पायांवर लावावा. आजकाल बाजारामध्ये सिलीकॉन युक्त आईस पॅक्स उपलब्ध आहेत, ह्यांच्या वापरानेही पायदुखीमध्ये आराम मिळतो. दररोज पंधरा ते वीस मिनिटे बर्फाने पायांवर शेक घेतल्यास पायांचे दुखणे कमी होऊ लागते.

अॅपल सायडर व्हिनेगर संधीवातासारख्या असह्य दुखण्यामध्येही आराम मिळवून देणारे आहे. संधिवातामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पायांमध्ये वेदना सुरु झाल्यास एक मोठा चमचा व्हिनेगर गरम पाण्याने भरलेल्या टब मध्ये घालावे, आणि त्यामध्ये पाय अर्धा तास बुडवून ठेवावेत. सैंधव, किंवा सैंधा मीठही पायांच्या वेदानांवरील प्रभावी उपाय आहे. ह्या मिठाने पायांवर मसाज केल्यास आराम मिळतो. त्याचप्रमाणे ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेलाच्या मसाजने ही पायाच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

हळदीची पूड कोमट केलेल्या तिळाच्या तेलामध्ये मिसळून ह्याने पायाच्या दुखऱ्या भागावर मसाज केल्यास पायांच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच गरम दुधामध्ये हळद घालून त्याचे सेवन केल्यानेही पायांच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment