सावधान ! हे आहेत जगातील सर्वात विषारी सर्प


जगभरामध्ये सापांच्या २५०० पेक्षाही अधिक जाती आहेत. ह्यांपैकी सुमारे पाचशे जातींचे साप अतिविषारी आहेत. ह्यामध्ये काही जातींचे साप इतके विषारी आहेत, की जर ह्या पैकी एक साप चावला, तर माणसाचे प्राण क्षणार्धात जाणे निश्चितच. ‘बेल्चर्स सी स्नेक’ ह्या जातीचा साप, दक्षिण-पूर्वी आशिया खंडामध्ये आणि उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये दिसतात. हा साप पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्वात विषारी सापांपैकी एक समजला जातो. ह्याच्या विषाचा काही मिलीग्राम अंश, हजार माणसांच्या मृत्युला कारणीभूत ठरू शकतो. हे साप समुद्रामध्ये आढळतात. मासे पकडण्यासाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांचा अंत, हा साप चावल्याने झाला आहे.

‘इनलँड ताईपन’ ह्या जातीचा सापही भयानक विषारी आहे. ह्याच्या एका दंशामध्ये सुमारे शंभर मिलीग्राम विष असते. ह्याचे विष ‘रॅटल स्नेक’च्या विषापेक्षा दहापट आणि कोब्राच्या विषापेक्षा पन्नास पट अधिक विषारी आहे. हा साप मानवी वस्तीमध्ये सहसा आढळत नाही. ‘इस्टर्न ब्राऊन स्नेक’ ह्या सापाच्या विषाचा १४,००० वा भाग ही माणसाचे प्राण घेण्यासाठी पुरेसा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा साप आढळतो. हा साप अतिशय जलद गतीने सरपटतो, आणि कोणताही धोका उद्भविल्याची जाणीव होताच हा साप दंश करतो. ‘रॅटल स्नेक’ हा साप त्याच्या शेपटीवर असलेल्या खवल्यांमुळे ओळखता येतो. ह्या सापाची शेपटी हलताना खुळखुळ्याप्रमाणे आवाज करीत असल्याने ह्याला ‘रॅटल स्नेक’ म्हटले जाते. ह्या सापाची पिलेहे अतिविषारी असतात.

‘डेथ आडर’ हा साप ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गीनिमध्ये आढळतो. हा साप इतर सापांची शिकार करतो. ह्या सापामध्ये न्युरोटॉक्सीक तऱ्हेचे विष आढळते. ह्याच्या विषाचा परिणाम होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे ह्या सापाने दंश केलेली व्यक्ती त्वरित दगावत नाही. ‘सॉ स्केल्ड वायपर’ हा साप वायपर जातीच्या सापांपैकी सर्वात विषारी म्हणून ओळखला जातो. हे साप भारत, चीन आणि दक्षिण-पूर्वी आशियामध्ये आढळतात. हे साप बहुतेकवेळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आढळतात. ह्या सापाने दंश केल्यास काही मिनिटातच मनुष्याचे प्राण जाणे निश्चित असते. ‘फिलिपिन कोब्रा’ हा साप अतिविषारी असून आपले विष दंश न करता, काही मीटर अंतरावर असलेल्या शिकारीवर हा साप आपले विष फेकूही शकतो. ह्याच्या विषाचा परिणाम थेट त्याच्या शिकारीच्या हृदयावर आणि श्वसनावर होतो.

‘टायगर स्नेक’ हा साप ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा सापही अतिविषारी आहे. तसेच आफ्रीकामध्ये आढळणारा ‘ब्लॅक माम्बा’ हा सापही अतिविषारी आहे. जमिनीवर अतिशय वेगाने सरपटणारा हा साप आहे. ताशी वीस किलोमीटर इतक्या वेगाने सरपटणारा हा साप जलद गतीने आपल्या शिकारीचा पाठलाग करण्यात तरबेज असतो. एकदा शिकार तावडीत सापडली, की हा साप सलग दहा ते बारा वेळा दंश करतो. आपल्या दंशातून सुमारे चारशे मिलीग्राम विष हा साप आपल्या शिकारीच्या शरीरामध्ये सोडतो. ह्या सापाचे केवळ एक मिलीग्राम विष माणसाचे प्राण घेण्यास पुरेसे असते.

Leave a Comment