जाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा सक्सेस मंत्रा


आजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून अमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेजोस हे ओळखले जातात. १५,००० करोड डॉलरहून अधिक त्यांची एकूण संपत्ती आहे. मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्सला देखील त्यांनी मागे टाकळे आहे. बिल गेट्सच्या संपत्तीपेक्षा ५५०० करोड डॉलर (३. ७४ लाख करोड रुपये) जास्त बेजोसची संपत्ती ही आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्यामते जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य जीवनसाथीची गरज आहे. जेफ आणि मॅकेन्जी बेजोसचायच्या लग्नाला २४ वर्ष झाली असून इन्वेस्टमेंट फर्मसाठी जेव्हा बेजोस यांनी मॅकेन्जीचा इंटरव्य्हू घेतला तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले. मॅकेन्जीला अनेक भेटींनंतर उमगळे की, त्यांना कसा जीवनसाथी हवा आहे. बेजोसच्या मते त्यांना मॅकेन्जीचा स्वभाव आवडला आणि त्यांना जीवनसाथी म्हणून व्यक्तीमध्ये ज्या क्वालिटीची गरज होती त्यांना मॅकेन्जीमध्ये दिसली.

बेजोस कधीच मल्टिटास्किंग करत नाहीत. ते एका वेळेस अनेक काम करत नसल्यामुळे एका कामात आपले १०० टक्के लक्ष लागत नाही. जर बेजोस इ-मेल वाचत असतील तर त्यावेळीस ते फक्त त्याच्यावर आपळे लक्ष केंद्रित करतात. दुसरीकडे लक्ष देत नसल्यामुळे त्यांचे एका कामात १०० टक्के लक्ष लागून राहते.

बेजोसनी म्हटले आहे की त्यांना बार टेंडर बनायचे होते. पण त्यांना काही कारणाने नंतर उमगले की ते बार टेंडरसाठी बनलेले नाही. वेळ आणि आयुष्य आराम करण्यात वाया घालवण्यापेक्षा काहीतरी अफलातून कामे करा. बेजोस म्हणतात की, आपले आयुष्य बनवण्यासाठी प्रत्येकाला २ संधी मिळतात. आता तुम्हाला त्यामध्ये ठरवायचे आहे की तुम्हाला आराम करायचा आहे की काम. तुम्ही जेव्हा ८० वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य समाधानाने जगलो असे वाटायला हवे.

नवीन गोष्टी करण्यामध्ये विश्वास ठेवा. बेजोसना असे वाटतं की, नव्या गोष्टी केल्याने नवी आशा मिळते. हेच कारण आहे की ते कधी काही आव्हानात्मक करण्यासाठी मागे फिरू नका. जेव्हा लोकांना क्लाउडची एबीसीडी माहिती नव्हती, तेव्हा त्या व्यवसायामध्ये त्यांनी हात घातला. व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विसची सुरुवात कारण्याबाबतीत अमेझॉन अन्य कंपनीपासून खूप पुढे आहे. आज हे दोन्ही बिझनेस कंपनीला खूप फायदा मिळवून देत आहेत.

Leave a Comment