ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर का असते ‘फुली’?


ट्रेनने प्रवास करताना किंवा ट्रेन आपल्या समोरून जात असताना ट्रेनच्या शेवटच्या बोगीवर आपण ‘फुली’चे चिन्ह पाहतो. हे चिन्ह ‘x’ असे दिसते. नियमांच्या अनुसार हे चिन्ह प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या बोगीवर असणे बंधनकारक असते. कोणत्याही ट्रेनच्या शेवटच्या बोगीवर असणारे हे चिन्ह पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असते. जुन्या काळी ह्या चिन्हाच्या खाली एक दिवा जळता ठेवला जात असे. ट्रेनची शेवटची बोगी निघून गेली हे रेल्वे कर्मचाऱ्यांना कळणे शक्य व्हावे ह्यासाठी हा जळता दिवा ठेवला जात असे. पण जसजसा काळ बदलत गेला, नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात आले, तशी ही पद्धत जाऊन, त्या दिव्याच्या जागी झगमगणारे विजेचे दिवे आले.

ट्रेनच्या शेवटच्या बोगीवर असणारा हा लाल वीजेचा दिवा झगमगत राहतो. ट्रेनच्या सर्व बोगी पुढे निघून गेल्याचा संदेश हा शेवटच्या बोगीवरील झगमगता दिवा देत असतो. धुक्याच्या किंवा धुवाधार पावसाच्या दिवसांमध्ये ट्रेनची शेवटची बोगी निघून गेल्याचा संकेत मिळण्यासाठीही हा झगमगता दिवा उपयोगी असतो. ‘x’ ह्या चिन्हाशिवाय ट्रेनच्या शेवटच्या बोगीवर ‘LV’ ही दोन अक्षरे ही लिहिलेली असतात.

‘LV’ ही दोन अक्षरे लिहिलेला बोर्ड पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा असतो. ह्या अक्षरांचा अर्थ ‘लास्ट वेहिकल’, म्हणजेच ही अक्षरे असलेला डबा किंवा बोगी त्या विशिष्ट ट्रेनची शेवटची बोगी, असा असतो. ह्या अक्षरांवरूनही ट्रेनची शेवटची बोगी कोणते हे ओळखणे शक्य होते. काही कारणाने ही चिन्हे असणारे बोगी दिसली नाही, तर आपत्कालीन स्थिती उद्भविली असू शकण्याचा अंदाज रेल्वे कर्मचाऱ्यांना येऊन, वेळीच उपाययोजना करणे शक्य होते.

Leave a Comment