इंडियन ऑइलमधील नोकर भर्तीसाठी असा कराल अर्ज


मुंबई – नॉन-एग्जिक्युटिव्ह पदासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd, IOCL) भर्ती निघाली असून एकूण ४७ जागांसाठीची ही भरती असणार आहे. IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. १५ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. पाइपलाइन डिव्हीजनमधील इंडियन ऑइल कंपनीतील या जागा असून विविध ठिकाणांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती आणि नियमांचे वाचन करणे गरजेचे असून अतिशय अचूक अर्ज करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो.

कोणत्याही विषयातील इंजिनिअररिंगचे तीन वर्षांचे शिक्षण इंडियन ऑइलकडून निघालेल्या या नोकर भरतीसाठी पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. याशिवाय १८ वर्षांपेक्षा कमी उमेदवाराचे वय असू नये आणि २२ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. आरक्षित प्रवर्गासाठी या नियमामध्ये सवलत देण्यात आली आहे.

प्रत्येकी १०० रु शुल्क नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जासाठी भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी यात सवलत देण्यात आली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे. अधिक माहितीसाठी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.