मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान


मुंबई : कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले. वर्षा निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड.अनिल परब व आमदार रविंद्र वायकर व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी झी मीडियाचे दीपक भातुसे, कृष्णांत पाटील, ‘एबीपी माझा’च्या रश्मी पुराणिक, अक्षय भाटकर, निलेश बुधावले, न्यूज १८ लोकमतच्या स्वाती लोखंडे, ज्योत्स्ना गंगणे, उदय जाधव, साम टीव्ही च्या वैदेही काणेकर या माध्यम प्रतिनिधींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले. कोविड-१९ च्या संकटकाळात सर्वच माध्यम प्रतिनिधींचे योगदान मोलाचे ठरत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केला.

यावेळी न्यूज रुम लाईव्ह या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक कमलेश सुतार यांनी प्रस्ताविक केले. उदय जाधव यांनी कोविड योद्ध्या सन्मान या संदर्भात प्रास्ताविक केले व आभार मानले.