फ्लोरिडात पडणार पालींंचा पाउस, नागरिकांना सावधानतेचा इशारा

या वर्षीचा नाताळ आणि आगामी आठवडा फ्लोरिडावासियांसाठी अजब संकटाचा ठरण्याची शक्यता असून फ्लोरिडा प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना सांभाळून राहण्याचा इशारा दिला आहे. नाताळ आणि पुढचा आठवडा फ्लोरिडा मध्ये पालीचा पाउस पडण्याची शक्यता आहे. इगुआना जातीच्या या पाली आहेत. फ्लोरिडा मध्ये नाताळचा पूर्ण आठवडा तापमान उणे ३० ते ४० डिग्री राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणि इगुआना पालींना थंडी अजिबात सोसत नाही त्यामुळे त्या गारठून झाडावरून पडतात. त्या इतक्या संखेने पडतात की जणू पालीचा पाउस पडतो आहे.

या पाली गारठून रस्त्यांवर पडतात पण त्या मेलेल्या नसतात. सनशाईन स्टेट अशी ओळख असलेल्या फ्लोरिडा मध्ये या पाली १९६० मध्ये आणल्या गेल्या होत्या. या पाली खतरनाक असतात कारण यातील काही विषारी आहेत. या पालींना थंडी सहन होत नाही. पूर्ण वाढीचा नर पाच फुट लांबीचा आणि २० पौंड वजनाचा असतो. या पाली झाडावरून कुणाच्या अंगावर पडल्या तर त्यांना इजा होऊ शकते. या पालीच्या शरीराची बनावट वेगळी असते आणि त्यांचे आयुष्यमान सरासरी २० वर्षे आहे.

यातील काही पालींना पाठीवर काटे असतात. त्यांचे दात अतिशय तीक्ष्ण असतात आणि त्याच्यापासून माणसाला इजा होऊ शकते.