सुहाना खान शिक्षण पूर्ण करण्यासाठी न्युयॉर्कला रवाना

बॉलीवूड शेहेनशाह, किंग खान म्हणजे शाहरुखची सुकन्या सुहाना वडिलांप्रमाणे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच वेगाने व्हायरल होतात. नवीन बातमीनुसार मुंबईत दीर्घकाळ परिवारासोबत राहिल्यानंतर सुहाना शिक्षण पूर्ण करण्यासाठी न्युयॉर्कला रवाना झाली आहे. तिचे कॉलेज सुरु झाले आहे आणि तिने न्युयॉर्क मधले तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

तीन वर्षे ब्रिटन मध्ये शिक्षण घेतल्यावर सुहाना पुढील शिक्षणासाठी न्युयॉर्क येथे आहे. सुहाना अभिनयाचे प्रशिक्षण घेते आहे. बॉलीवूड डेब्यू पूर्वीच चांगले फॅन फॉलोइंग मिळविलेली सुहाना दररोज मित्रमंडळाच्या सोबतचे फोटो शेअर करत असते आणि त्यांना हजारो लाईक मिळतात. सुहानाचे इन्स्टाग्रामवर १५ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या बॉलीवूड डेब्यूच्या बातम्या सतत येत असतात पण शाहरुखने शिक्षण पूर्ण केल्यावर मगच चित्रपट येण्याचा सल्ला तिला दिला आहे. सुहाना तिनेच कॉलेजसाठी बनविलेल्या एका शॉर्टफिल्म मध्ये या पूर्वी दिसली आहे.