कर्नाटकने रद्द केला नाईट कर्फ्यूचा आदेश


बंगळुरु – नाईट कर्फ्यूचा आदेश महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या कर्नाटकातही लागू करण्यात आला होता. पण आता नाईट कर्फ्यूचा निर्णय कर्नाटकमध्ये मागे घेण्यात आला आहे. तांत्रिक सल्लागार समितीने परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यावर दिलेल्या शिफारशीवरुन नाईट कर्फ्यूचा आदेश मागे घेत असल्याचे कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

कर्नाटकात रात्री ११ ते सकाळी पाच या वेळात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. नाईट कर्फ्यूच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात वाद सुरु आहे. विरोधी पक्षाने या मुद्यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. रात्री करोना पसरतो, दिवसा नाही का? असा प्रश्न महाराष्ट्रात विरोधकांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्रात रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.