नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण


नाशिक – नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत दिले जाते. दरम्यान नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये सगळ्या कोरोना बाधितांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

नाशिकमध्ये एका तीन महिन्यांच्या बाळाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आता नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे सध्या नागरिकही धास्तावले असल्यामुळे महापालिका प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.