संप अर्जेंटिनात, मालामाल रामदेवबाबा
फोटो साभार शेअर संसार
पतंजली उद्योगसमूह गेले काही दिवस सतत चर्चेत असून गेले काही दिवस कंपनीच्या नफ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पतंजलीने नुकत्याच खरेदी केलेल्या रुची सोया कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे रामदेवबाबा मालामाल झाले असले तरी या मागे अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या मजूर संपाचा हातभार लागला असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस अर्जेंटिना मध्ये कामगार संप सुरु आहे आणि त्यामुळे तेथील सोया तेल उत्पादन ठप्प झाले आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती २०१४ च्या तुलनेत सहा पटीने वाढल्या आहेत. रुची सोयाच्या संचालक मंडळात योगगुरु रामदेवबाबा, त्यांचे भाऊ आणि बाळकृष्ण यांच्या नियुक्तीस मंजुरी मिळाल्याने रुची सोयाचा शेअर वाढला आहे.
अर्जेंटिना संप आणि रामदेवबाबा कमाई वाढ यांचा संबंध असा की भारत वास्तविक अर्जेंटिना मधून सोया तेल आयात करतो. पण अति उन्हाळ्याने तेथे पेरण्यांना उशीर झाला आणि त्यात मजूर संप सुरु झाल्याने लागवड बंद आहे. त्यामुळे सोया तेलाचे भाव १५ दिवसात १०० डॉलर्सने वाढले आहेत. रुची सोया भारतातील सर्वात मोठी खाद्यतेल कंपनी आहे. २०१९ मध्ये रुची सोयाचे दिवाळे वाजले होते. पतंजलीने रुची सोयाची खरेदी ४३५० कोटी रुपयात केली असून पतंजलीकडे ९९.०३ हिस्सा आहे.