यजुवेंद्र पाठोपाठ या क्रिकेटपटूनाही पडणार लग्नाच्या बेड्या?

२०२० वर्ष संपतासंपता टीम इंडियाचा खेळाडू, स्पिनर यजुवेंद्र चहल याने त्याच्या विवाहाची बातमी देऊन सगळ्यांना चकित केले. त्याने २२ डिसेंबर रोजी धनश्री वर्मा हिच्यासोबत सात फेरे घेतले. आता यजुवेंद्रच्या पाठोपाठ टीम इंडिया मधील हे खेळाडू सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त थडकले आहे.

विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुल गेले काही दिवस खेळात चांगली कामगिरी बजावतो आहे. त्याच्या लव्ह लाईफ मध्येही तो बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याची कन्या अथीना हिच्यासोबत इश्क फार्मावतो असून त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर केले गेले आहेत. लवकरच राहुल बोहल्यावर चढणार असल्याचेही सांगितले जात आहे.

विकेटकिपर ऋषभ पंत गर्लफ्रेंड इशा नेगी सह अनेक दिवस रिलेशनशिप मध्ये आहे. इशा देहरादूनची असून इंटेरिअर डिझायनर आहे. इन्स्टाग्रामवर ती बरीच अॅक्टीव्ह असते. हे दोघे लवकरच लग्न करतील असे बोलले जात आहे.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह दक्षिणेतील तेलगु अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याबरोबर डेटिंग करतो आहे मात्र या दोघानीही रिलेशनशिप मध्ये असल्याचे नाकारले आहे. मुंबई इंडियाचा फलंदाज ईशान किशनची गर्ल फ्रेंड अदिती हुंडिया मॉडेल आहे. मिस इंडिया स्पर्धेत २०१७ मध्ये सहभागी झालेल्या अदितीने मिस इंडिया राजस्थानचा खिताब मिळविला आहे. तिने ईशान बरोबरचे तिचे अनेक फोटो शेअर केले असून तिला क्रिकेटची खूप आवड आहे.