नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या युजवेंद्र चहलला रोहित शर्माने दिला सल्ला


मंगळवारी भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे विवाहबद्ध झाले. लग्नाचे फोटो चहलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या दोघांचा हा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात युझवेंद्र चहल आणि धनश्रीचा साखरपुडा पार पडला होता. धनश्रीदेखील चहलबरोबर आयपीएल 2020 दरम्यान यूएईमध्ये उपस्थित होती. त्याचबरोबर सामन्यांदरम्यान ती चहलची टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती. चहल व धनश्री यांना लग्नानंतर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. त्यात हिटमॅन रोहित शर्माने युजवेंद्रला एक सल्ला दिला आहे.

चहल आणि धनश्री यांचे चाहते दोघांच्या लग्नानंतर अत्यंत आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर कमेंट देखील करत आहेत. धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. सोशल मीडियावर धनश्री अनेकवेळा आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत असतात. त्याचबरोबर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. धनश्रीचे इंस्टाग्रामवरही पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.


सोशल मीडियावर चहल आणि रोहित यांच्यात नेहमी चेष्टामस्करी पाहायला मिळते. चहल अनेकदा रोहित व त्याची पत्नी रितिका यांची फिरकी घेतानाही दिसतो. पण, आता त्याची रोहितने फिरकी घेत ट्विट करत अभिनंदन भावा. तुम्हा दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा… प्रतिस्पर्ध्यांसाठी वापरणारी गुगली धनश्रीसाठी वापरू नकोस.. असे म्हटले आहे.