लियोनेल मेस्सीने मोडले पेले यांचे रेकॉर्ड

फोटो साभार स्पुतनिक न्यूज

जगातील महान फुटबॉलर्स मध्ये समाविष्ट असलेला अर्जेंटिनाचा खेळाडू लियोनेल मेस्सी याने फुटबॉल लिजंट पेले यांचे एकच क्लब कडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याचे रेकॉर्ड मंगळवारी मोडले. त्याने बार्सिलोना कडून खेळताना ६४४ वा गोल करून पेले ना मागे टाकले. पेले यांनी १९५६ ते १९७४ या काळात सांतोस क्लबसाठी खेळताना १९ सिझन मध्ये ६४३ गोल केले होते.

मेस्सीने ७४९ सामन्यात ६४४ गोल केले असून बार्सिलोना विरुध्द रियल वेलाडोलीड सामन्यात ६४४ वा गोल डागला. या पराक्रमाने मेस्सी अतिशय आनंदित झालाच पण पेले यांनीही मेस्सी याचे अभिनंदन केले असून मेस्सी त्यांचा अतिशय आवडता खेळाडू असल्याचे आणि पेले त्यांचे मोठे चाहते असल्याचे सांगितले आहे.

३३ वर्षीय मेस्सीने २००४ मध्ये बार्सिलोना क्लबशी करार केला होता त्यावेळी मेस्सी १८ वर्षाचा होता. १६ ऑक्टोबर २००४ मध्ये मेस्सीने डेब्यू सामना खेळला आणि तेव्हापासून टीमसाठी १० ला लीगा, ४ युईएफए चँपियनशिपसह ३४ खिताब मिळविले आहेत. त्याचे बर्सिलीना बरोबरचे कॉन्ट्रक्ट २०२१ मध्ये संपत असल्याचे समजते. ३० जून रोजीच तो ७०० पेक्षा जास्त गोल केलेला ७ वा खेळाडू बनला होता. अर्जेंटिना साठी त्याने ७० गोल केले आहेत.

सर्वाधिक गोल करण्याचे रेकॉर्ड ऑस्ट्रियाच्या जोसेफ बिकन याच्या नावावर असून त्यांनी ८०५ गोल्स केले आहेत.