अॅपल ची इलेक्ट्रिक कार २०२४ मध्ये येणार

फोटो साभार नवभारत टाईम्स

एकापेक्षा एक वरचढ स्मार्टफोन्स, आयपॅडस, मॅकबुक, एअरपॉडस असे शेकडो इलेक्ट्रिक प्रोडक्ट देणाऱ्या अमेरिकन जायंट तंत्रज्ञान कंपनीने म्हणजे अॅपलने आता इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये लक्ष घातले असून त्यांची इलेक्ट्रिक कार २०२४ पर्यंत बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. अर्थात अॅपलची कार येणार असल्याच्या बातम्या २०१४ मध्येच आल्या होत्या पण त्यानंतर अॅपलने तंत्रज्ञान आणि सोफ्टवेअरवर अधिक लक्ष केंद्रित करून दरवर्षी नवनवीन शानदार उत्पादने बाजारात आणण्यावर भर दिला होता.

आता मात्र अॅपल त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर वेगाने काम करत आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन प्रोसेसर प्रमाणे अॅपल कारसाठी स्वतःचे बॅटरी तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे रॉयटरच्या बातमीत म्हटले गेले आहे. यामुळे कमी खर्चात चांगले मायलेज देणारी कार देणे अॅपलला शक्य होईल असे समजते. कारचे डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी अॅपल अनेक कंपन्यांबरोबर चर्चा करत आहे. अॅपल इलेक्टिक कार टेस्ला ला तगडी टक्कर देईल कारण या दोन्ही कंपन्या प्रीमियम उत्पादनासाठी प्रसिध्द आहेत असे जाणकारांचे मत आहे.