खास महिलावर्गासाठी आला लावा बी यु स्मार्टफोन

फोटो साभार यु ट्यूब

स्वदेशी स्मार्टफोन कंपनी लावा ने दीर्घ प्रतिक्षेनंतर शेवटी खास महिला वर्गासाठी बनविलेला खास स्मार्टफोन लावा बी यु नावाने लाँच केला आहे. ६८८८ रुपये किमतीच्या या फोन मध्ये अनेक मस्त फिचर्स दिली गेली आहेत. अँड्राईड १० गो एडिशनचा हा फोन आकर्षक कलर कोऑर्डीनेशन मध्ये असून महिला वर्गाच्या एकदम पसंतीस उतरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

या फोनमध्ये महिलांसाठी काही आवश्यक सुरक्षा अॅप्स इनबिल्ट आहेत असे समजते मात्र ही अॅप्स कोणती याचा खुलासा होऊ शकलेला नाही. पिंक गोल्डन कलरच्या या फोनला २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज, ४०६० एमएएच बॅटरी दिली असून बॅटरी रीमुव्हेबल आहे. फोनसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आहे. अन्य फिचर्स मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असून प्रायमरी कॅमेरा १२ एमपीचा तर सेकंड कॅमेरा २ एमपीचा आहे. सेल्फी साठी ८ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. कॅमेऱ्याजवळ डायमंड कलर कॉम्बीनेशन असल्याने फोनचा लुक आकर्षक बनला आहे.