देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार उद्धव ठाकरे : संजय राऊत


मुंबई – राज्यात रात्रीची संचारबंदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केल्यावर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. ते कोणत्याही विषयावर टीका करत सुटतात. भारतरत्न पुरस्कार टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना द्यायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. टीका करणाऱ्यांना लोके मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. मुख्यमंत्र्यांना संचारबंदी लादण्यात आनंद होत नसल्याचेही राऊत म्हणाले.

अनेक राजकीय भूकंप आगामी काळात होणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. तीन पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करायचे ठरवले आहे. विरोधक आमचा एकही आमदार फुटणार नसल्याचे म्हणत होते. पण थोडे दिवस थांबा, काय काय होत आहे ते दिसेल. तो भूकंप भविष्यात होईल त्याचे केंद्रस्थान शिवसेना भवन असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.देशाचे उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावे अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त पक्ष नाही, सेना एक कुटुंब आहे आणि बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आजही उद्धव ठाकरे काम करत असल्याचेही राऊत म्हणाले.