Instagram Star ला ‘बट लिफ्ट सर्जरी’ पडली महागात; गमवावा लागला जीव


आपल्या पैकी अनेकजण आकर्षक आणि सुंदर दिसावे यासाठी स्वतःच्या शरीराची विशेष काळजी घेतात. याबद्दल विशेषतः सेलिब्रिटी आणि कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या व्यक्ती प्रचंड जागरूक असतात. सेलिब्रिटी मनोधक दिसण्यासाठी उपचारांसोबतच शस्त्रक्रियाही करून घेतात. पण सुडौल दिसण्याच्या नादात एका इन्स्टाग्राम स्टारला आपला जीव गमवावा लागला आहे. या इन्स्टाग्राम स्टारचे जोसेलिन कॅनो असे नाव आहे.

इन्स्टाग्राम स्टार २९ वर्षीय जोसेलिन कॅनो हिचे लाखो चाहते आहेत. सुडौल दिसण्यासाठी जोसेलिनने ‘बट लिफ्ट सर्जरी (पार्श्वभागाची शस्त्रक्रिया) केली होती. पण, शस्त्रक्रिये दरम्यान चूक झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. ७ डिसेंबर रोजी जोसेलिनचा मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त मिररने दिले आहे.

मेक्सिकन किम किर्दाशियन असे टोपणनाव जोसेलिनला तिच्या चाहत्यांनी दिले होते. मिररने दिलेल्या वृत्तानुसार जोसेलिन शस्त्रक्रियेसाठी कोलंबियाला गेली होती. पण, शस्त्रक्रियेदरम्यान, अडथळे आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्काराचे यू ट्यूबवरून कोलंबियातील न्यूपोर्ट बीचमधील एका रहिवाशाने लाईव्ह केले.

जोसेलिनवर कोरोनामुळे गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला असल्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याबाबत तिच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे भाष्य यावर करण्यात आलेले नाही. जोसेलिनच्या लिरा मेर्सर नावाच्या चाहतीने निधनाच्या वृत्ताविषयी पोस्ट केली. अरे देवा, जोसेलिन कॅनोचे शस्त्रक्रियेदरम्यान कोलंबियात निधन झाले. हे धक्कादायक असल्याचे तिने म्हटले आहे.