‘डॉक्टर जी’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आयुष्मान

 

फोटो साभार मिडीयम

एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणारा गुणी अभिनेता आयुष्मान खुराणा त्याच्या करियर मध्ये प्रथमच डॉक्टरची भूमिका बजावत आहे. जंगली पिक्चर्सच्या ‘डॉक्टर जी’ मधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जंगली पिक्चर्सने यापूर्वी बरेली की बर्फी, बधाई हो या चित्रपटाची निर्मिती केली असून या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर चांगली कामगिरी बजावली आहे.

आयुष्मान सांगतो, त्या चित्रपटाची कथा मला खूप आवडली. ती वेगळी आणि एकदम फ्रेश आहे. नवीन संकल्पना आहे पण प्रेक्षकांचे ती पुरेपूर मनोरंजन करेल आणि त्यांना विचार करायला सुद्धा भाग पाडेल. प्रथमच डॉक्टरची भूमिका साकारत असल्याने उत्साहित आहे. चित्रपटातून दिला गेलेला नवा संदेश तुमच्या हृदयाला हात घालील असा विश्वास वाटतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहे. हा चित्रपट युवा तसेच फॅमिली अश्या दोन्ही प्रकारातील प्रेक्षकांना आवडेल असे सांगून सीईओ अमृता पांडे म्हणाल्या, आयुष्मान बरोबर आम्ही तिसरा चित्रपट करतो आहोत. ही हॅट्रीक शाबित व्हावी असे प्रयत्न आहेत. बधाई हो ने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत.