एलजी रोलेबल स्मार्टफोन घ्यायचाय? मग आत्ताच साठवायला लागा पैसे

एलजी रोलेबल डिस्प्लेचा नवा स्मार्टफोन २०२१ च्या जून महिन्यात बाजारात आणत आहे. या फोनच्या रिलीज पूर्वी टिप्स्टर ट्रोन ने या स्मार्टफोनची किंमत आणि काही फिचर्स शेअर केली आहेत. त्यावरून हा फोन सर्वसामान्य ग्राहकांना सहज घेणे शक्य नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन घेण्याची इच्छा आहे त्यांनी आत्तापासूनच पैसे साठवायला हवेत असे म्हणता येईल.

एलजी हा स्मार्टफोन एलजी रोलेबल किंवा एलजी स्लाईड या नावाने आणेल असे बोलले जात आहे. या फोनसाठी साईड रोलिंग डिस्प्ले दिला जात आहे. स्क्रीन पूर्ण उलगडला की तो टॅब्लेट मध्ये बदलेल. ७.४ इंची रोलेबल डिस्प्ले असेल आणि या फोनसाठी स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला जाईल. १६ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज, आणि ४२०० एमएएच बॅटरी दिली जाईल.

या फोनची किंमत २३५९ डॉलर्स म्हणजे साधारण १ लाख ७५ हजार रुपये असेल.