आज जर छत्रपती असते तर संजय राऊतांचा पहिल्यांदा कडेलोट केला असता – निलेश राणे


मुंबई – मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने चार लाख स्वयंसेवक हे संपर्क अभियान राबविणार असून हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार असल्याचा आरोप शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून केला आहे. दरम्यान, यावरून आज जर महाराज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता, असे म्हणत भाजपे नेते निलेश राणे यांनी यावर जोरदार हल्लाबोल केला.


लाज सोडली शिवसेनेनी. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालते तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय? जनाची नाही पण किमान मनाची लाज तर ठेवा, असे म्हणत शिवसेनेवर राणे यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला.