सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा येणार सहा कॅमेऱ्यासह

फोटो साभार न्यू अॅॅटलस

सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीज स्मार्टफोन विषयी सतत काही ना काही समोर येत असतानाच आता नव्या सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्राचे फिचर्स सांगणारे फोटो लिक झाले आहेत. या फोटोवरून नव्या एस २१ अल्ट्रा मध्ये नवे काय याचा खुलासा केला गेला आहे. एस २१ सिरीज स्मार्टफोनची हार्डवेअर गेले अनेक दिवस विशेष चर्चेत आहेत.

टेक साईट ‘द वर्ज’ नुसार या फोनच्या रिअरला पाच कॅमेरे असून फ्रंटला एक कॅमेरा आहे. रिअरच्या पाच पैकी दोन कॅमेरे ३ एक्स झूमवाले तर बाकी तीन कॅमेरे १० एक्स झूमवाले आहेत. १० एक्स क्वालिटी मॅनेज करण्यासाठी हायब्रीड झूमचा वापर केला गेला आहे. प्रायमरी कॅमेरा १०८ एमपीचा आहे तर फ्रंट कॅमेरा ४० एमपीचा आहे. हा फोन आयफोन १२ शी स्पर्धा करेल असे सांगितले जात आहे. या फोन साठी सुद्धा कंपनी चार्जर देणार नाही. ग्राहकांना तो स्वतंत्र विकत घ्यावा लागणार आहे.

एस २१ सिरीज स्मार्टफोन १४ जानेवारीला लाँच होणार असल्याचे सांगितले जात आहे. एस २१ अल्ट्रासाठी ग्लास मेटल सँडविच डिझाईन असेल आणि गोरील्ला ग्लास वापरली जाईल. ६.८ इंची इन्फिनिटी झिरो एज अमोलेड डिस्प्ले, १२ जीबी रॅम, १२८ / २५६ / ५१२ जीबी स्टोरेज,५००० एमएएच बॅटरी, अँड्राईड ११ ओएस अशी त्यांची अन्य फिचर्स असतील. पँथम ब्लॅक आणि पँथम सिल्व्हर अश्या दोन रंगात तो मिळेल. युरोप मध्ये त्यांची किंमत १३९९ डॉलर्स असेल असेही समजते.