जगातील सर्वात मोठा मास्क, योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लाँच होणार

 

फोटो साभार अमर उजाला

उत्तर प्रदेशातील खादी ग्रामोद्योग विभागात जगातील सर्वात मोठा मास्क तयार केला जात असून त्याचे लाँचिंग २ जानेवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार आहे. करोना काळात हार न स्वीकारता पाय घट्ट रोवून त्याचा मुकाबला करा असा संदेश देणाऱ्या या मास्कचे डिझाईन लखनऊ येथील डिझायनर मनिष त्रिपाठी यांनी केले आहे. रविवारी खादी ग्रामोद्योग विभागाचे वरिष्ठ सचिव नवनीत सहगल यांनी ओड्रा फाउंडेशन द्वारा आयोजित खादी फॅब्रिक हँडओव्हर सेरेमनी मध्ये डिझायनर त्रिपाठी यांच्याकडे खादी कपडा सुपूर्त केला.

हा मास्क बनविण्यासाठी ७५ जिल्ह्यातून मिळालेला खादी कपडा त्रिपाठी यांना दिला असून १५० चौ.मीटर आकाराचा हा मास्क हॉट एअर बलूनच्या सहाय्याने डिस्प्ले केला जाणार आहे. त्याचे लाँचिंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते २ जानेवारीला होत आहे. या मास्क साठी ७५ जिल्ह्यातून २-२ मीटर खादी कापड दिले गेले आहे. याचवेळी खादी वस्त्र प्रदर्शन आणि फॅशन शो आयोजित केला गेला असून त्यात देशातील नामवंत फॅशन डिझायनर त्याचे खादी पासून बनविलेले कपडे सादर करणार आहेत.