मलियाच्या बॉयफ्रेंड मुळे वाढला ओबामांचा खर्च

 

फोटो साभार रडार ऑनलाईन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा अनेक कारणांनी चर्चेत असतात. चांगले राष्ट्रपती, चांगले कुटुंबप्रमुख या कारणांनी ते चर्चेत असतात तसेच त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या पुस्तकात भारतीय राजकीय नेत्यांवर केलेल्या टिपण्णी मुळे चर्चेत होते. सध्या मात्र ते कन्या मलियाच्या बॉयफ्रेंड वरून केलेल्या टिपण्णीवरून चर्चेत आले आहेत. द बिल सिमोन पॉडकास्ट शो मध्ये बोलताना ओबामा यांनी मलियाचा मित्र रोरी फार्कूहसन याच्याविषयी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे.

मलिया आणि तिचा हा मित्र हॉवर्ड विद्यापीठात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री जमली आहे. ओबामा सांगतात, मला रोरी फार आवडत नाही पण तो चांगला मुलगा आहे. क्वारंटाईन काळात तो ओबामा कुटुंबात काही दिवस राहिला होता. तो ब्रिटीश असून त्याला विसा मध्ये काही अडचणी आल्या होत्या आणि त्याला जॉब मिळाला होता. त्यामुळे त्याला ओबामा यांनी घरी राहायची परवानगी दिली होती.

ओबामा म्हणतात, तरुण मुलांचे खाण्याचे प्रमाण फार असते. रोरी आमच्या घरी होता त्या काळात आमचे वाणसामानाचे बिल ३० टक्क्यांनी वाढले होते. अर्थात या काळात मलिया, साशा आणि रोरी यांच्या सोबत फार चांगला वेळ घालविता आला असे सांगून ओबामा म्हणतात, या काळात मी त्यांना काही खेळ खेळायला शिकविले पण तरी रोरीची खादाडी पाहून माझ्यावर हैराण होण्याची पाळी आली.