या दिवशी रिलीज होणार वरुण आणि साराचा ‘कुली नंबर 1’ !


ख्रिसमसच्या दिवशीच वरुण धवन आणि सारा अली खानचा आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘कुली नंबर 1’ च्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल विविध चर्चा रंगल्या होत्या. हा चित्रपट यापूर्वी 1 मे रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मध्यंतरी हा चित्रपट 13 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याची बातमी मिळाली. पण हा चित्रपट आता ख्रिसमसच्या निमित्ताने अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली आहे.


सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता तरण आदर्श यांनी शनिवारी एक ट्विट करत या ख्रिसमसच्या दिवशी अॅमेझॉन प्राइमवर कुली नंबर 1 रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट कोणत्याही सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. सारा अली खान आणि वरुण धवनची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. येत्या 25 डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवन यांचा आगामी चित्रपट ‘कुली नं. 1’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.