वॉशिंग्टन – कोरोनामुळे संकटात अडकलेल्या अमेरिकेमध्ये दोन लसींना अखेर परवानगी देण्यात आली असून या लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. पण ही लस घेतल्यानंतर नागरिकांवर या लसीचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आल्यामुळे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनने (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र) तातडीने पावले उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दुष्परिणाम; अमेरिकेच्या ‘सीडीसी’ने दिल्या महत्त्वाच्या सूचना
फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या कोरोना लसींना अमेरिकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी आपातकालीन वापरासाठी देण्यात आलेली असून, अमेरिकेत लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. लसीकरण सुरू असतानाच चिंतेत भर घालणारी घटना समोर आली. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले. ही घटना अलास्का राज्यात घडली.
अॅलर्जीसारखा त्रास लस घेतल्यानंतर जाणवू लागला आहे. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर अमेरिकेच्या रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्राने (सीडीएस) तात्काळ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या व अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना लस घ्यावयाच्या खबरदारी बद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे ज्या व्यक्तींना त्रास सुरू झाला आहे. लसीचा दुसरा डोस त्यांनी घेऊ नये, असे सीडीएसने स्पष्ट केले आहे. संबंधित व्यक्तीला लस दिल्यानंतर अॅलर्जीपासून संरक्षण करणारे औषध देण्यात आले आणि त्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यास या प्रकरणाला गंभीर समजले जाईल. ज्या व्यक्तींना लसीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्याचे निर्देश सीडीएसने दिले आहेत.