टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे पुन्हा ट्रोल झाली अनुष्का शर्मा


ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिला कसोटी सामन्यात टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीने अतिशय खराब कामगिरी केली. अभिनेत्री अनुष्का शर्मावर या खराब कामगिरीचे खापर चाहत्यांनी फोडले आहे. शनिवारी सामन्यात अतिशय लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर ट्विटरवर अनुष्का शर्मा आणि तिच्या होणाऱ्या बाळाला ट्रोल करण्यात आला.

विराट कोहली आणि भारतीय संघाने शनिवारी अतिशय खराब प्रदर्शन केले. भारताच्या संघाने या सामन्यात फक्त ३६ धावा करून बाद झाला. यावेळी चाहते अतिशय नाराज झाले. यावर जगभरात मीम्स तयार होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या मीम्सच्या माध्यमातून अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

अनुष्कामुळे कायमच भारतीय संघाचे पराजय होत असल्याचे चित्र नेटकऱ्यांनी उभे केले आहे. असे पहिल्यांदा घडलेले नाही जेव्हा टीम इंडिया किंवा विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्समुळे अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. या सामन्यामुळे अनुष्काला खूप सुनावण्यात आले होते. अनेकदा याला विराट कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे.