रूपे चे नवे फिचर, ऑफलाईन करता येणार पेमेंट

फोटो साभार पत्रिका

स्वदेशी पेमेंट सिस्टीम रूपे कार्ड अधिक उपयुक्त होण्यास नवीन फिचर महत्वपूर्ण ठरणार असून यामुळे ग्राहक ऑफलाईन पेमेंट करू शकणार आहेत. या व्यवहारासाठी इंटरनेटची गरज राहणार नाही. त्यामुळे दूरवरचा भाग, छोटी गावे, वस्त्या येथेही नागरिक त्यांचे व्यवहार सहज करू शकणार आहेत.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने कॉन्टॅक्टलेस कार्डचा नवा पर्याय उपलब्ध केला असून तो प्रायोगिक पातळीवर सुरु झाला आहे. अर्थात हे व्यवहार त्या त्या भागात करताना तेथे पॉईंट ऑफ सेल असणे गरजेचे आहे. जेथे इंटरनेट सहजी उपलब्ध नाही किंवा सिग्नल कमजोर आहे तेथे हे नवे फिचर छोटे व्यवहार करण्यासाठी सहज वापरता येणार आहे. कॅशलेस इकोनॉमी स्वप्न पूर्ततेसाठी हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. या सेवेला रिझर्व बँकेने मंजुरी दिली आहे.

या फिचरच्या मदतीने व्यवहार करताना पासवर्ड देण्याची गरज नाही. हे पेमेंट ऑनलाईन पेमेंट मोड पेक्षा वेगळे आहे. व्यवहार करताना माहिती द्यावी लागते तेथे फक्त ओ.के. क्लिक केले की क्षणात पेमेंट प्रक्रिया पूर्ण होणार आहे असे सांगितले जात आहे.