बेस्ट फुटबॉलर रॉबर्ट जगतो ऐषारामी आयुष्य

फोटो साभार अमर उजाला

बाथर्म म्युनिख तर्फे खेळणारा पोलंडचा स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्की फिफा प्लेअर ऑफ द इअर २०२० निवडला गेला आहे. रॉबर्ट लेवांडोव्स्की जसा त्याच्या कौशल्यपूर्ण खेळासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो त्याच्या ऐषारामी जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. या ३२ वर्षीय खेळाडूने युरोपियन लीग मध्ये यंदा सातत्याने उत्तम कामगिरी बजावली असून टीम तर्फे सर्वाधिक गोल केले आहेत.

तो अतिशय ऐषारामी आयुष्य जगतो. सध्या तो जर्मनी मध्ये राहत असला तरी मायदेशी म्हणजे पोलंड मध्ये एक अलिशान घर त्याने बांधले आहे. हे घर बांधण्यासाठी त्याने ७० कोटी खर्च केला आहे. या घरात अनेक सुविधा आहेत. खासगी सिनेमा हॉल, गोल्फ सिमुलेटर, खेळ आणि प्रशिक्षण यासाठी स्वतंत्र जिम अश्याही सुविधा येथे आहेत.

त्यांच्या क्लब तर्फे तो दर आठवड्याला २,७५,००० पौंड कमावतो. शिवाय अनेक ब्रांडचा तो सदिछ्या दूत असून त्यातूनही तो भरपूर कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती आहे ४५ दशलक्ष डॉलर्स.