७१ वर्षाच्या निर्मात्याशी ३६ वर्षीया गायिकेने बांधली लग्नगाठ, लवकरच होणार जुळ्या मुलांची आई


हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका कॅथरीन मॅकफी ही गरोदर असून ती लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यांच्यासाठी हे एक मोठे सरप्राईज होते. कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या जोडप्याने अखेर ही गोड बातमी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे कॅथरिन ही अवघ्या 36 वर्षाची असून तिने 71 वर्षीय डेव्हिड फॉस्टरशी जून 2019 मध्ये लग्न केले होते. डेव्हिड फॉस्टर हे व्यवसायाने प्रसिद्ध निर्माते असून या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या तफावतीमुळेच या जोडप्याची सर्वाधिक चर्चा रंगली होती.

एवढेच नाही तर डेव्हिडची कॅथरीन ही पाचवी पत्नी आहे. कॅथरीन याच महिन्यामध्ये आई होणार आहे. गेल्या काही दिवसांपासूनच कॅथरीनच्या प्रेग्नंसीच्या बातम्या चर्चेत होत्या. ती प्रेग्नेंट असल्याचे सा-यांनाच इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे कळले होते. तिने नुकतेच बेबी बंम्प फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो पाहून सा-यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

कॅथरीन गरोदर असल्याचे कळाल्यापासून ती खूप अतिउत्साही झाल्याचे दिसते. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जुळ्या बाळाचे आगमन आपल्या जीवनात होणार असल्याचे समजल्यापासून दोघेही खूप खुश आहे. तिचे हे पहिले बाळ आहे तर तिचा पती डेविड फोस्टरचे हे सहावे आपत्य असणार आहे. त्यानुसार डेविड वयाच्या ७१ व्या वर्षी सहाव्यांदा वडील होणार आहे.

कॅथरिनसह लग्नाआधी फोस्टरने चार वेळा लग्न केले होते. त्याची चारही लग्न फार काळ काही टिकली नाहीत. तर कॅथरिनचेही डेविडसह दुसरे लग्न आहे. तुर्तास दोघेही एकमेकांना वेळ देत बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. कॅथरिनला डेविडही पुरेपुर वेळ देत तिची काळजी घेत आहे. सध्या डेविडनेही कॅथरिन लवकरच बाळाला जन्म देणार असल्यामुळे कामातून ब्रेक घेत फक्त कॅथरिनलाच वेळ देत आहे. तिला काय हवे काय नको या सगळ्या गोष्टी तो नित्यनियमाने करत आहे.