रोहित पवारांनी ट्विट करत पुन्हा एकदा साधला केंद्र सरकारवर निशाणा


मुंबईः राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोना संकटामुळे फटका बसलेला असतानाच त्याचबरोबर राज्याच्या तिजोरीत निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी या संकटांमुळेही खडखडाट आहे. त्यावरुनच वेळोवेळी केंद्राने जीएसटीचे पैसे थकवल्याचा आरोप राज्य सरकारकडून वारंवार होत आहे. त्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट केले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून २०१५-१६मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळे राज्याचे २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले. ही चूक झाली नसती, तर यंदा अंत्यत अडचणीच्या वर्षात आपल्याला जीएसटी भरपाईपोटी ६३०० कोटीपेक्षाही अधिक निधी मिळाला असल्याचे म्हणत रोहित पवारांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


जीएसटी भरपाईचे पैसे हे आपल्या हक्काचे आहेत, कारण स्वतः नुकसान सोसून आपला कर जमा करण्याचा हक्क आपण केंद्र सरकारला दिला आहे. विरोधी पक्षासह सर्वांनी एकत्र येऊन हक्काच्या जीएसटी भरपाईच्या पैशासाठी केंद्राकडे मागणी करायला हवी. कदाचित यामुळे पूर्वीच्या चुकांचे प्रायश्चित्त तरी घेता येईल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.