ऐकावे ते नवलच; लग्नापूर्वीच नेहा कक्कर गरोदर?


ऑक्टोबर महिन्यात बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर विवाहबद्ध झाली. २४ ऑक्टोबर रोजी नेहाने रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीत गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहेत. पण सध्या सोशल मीडियात नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असून सध्या तिच्या चाहत्यांमध्ये तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची चर्चा होत आहे.


अलिकडेच आपला आणि रोहनप्रीतचा एक फोटो सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहाचे बेबीबंप या फोटोमध्ये दिसत असून ती गरोदर असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करताना नेहाने त्याला “खयाल रखा कर”, असे कॅप्शन दिले आहे. रोहनप्रीतने देखील तिच्या या फोटोवर आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर नेहाचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती अशी चर्चा रंगली आहे. २४ ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत.