यावर्षी रॉबर्ट लेवांडोस्की बनला फिफा प्लेअर ऑफ द ईअर

फिफा प्लेअर ऑफ द ईअर २०२० चा खिताब यंदा पोलंडवासिय खेळाडू ३२ वर्षीय रॉबर्ट लेवांडोस्की याला जाहीर झाला असून यावर्षी त्याने दिग्गज खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून या खिताबावर हक्क मिळविला आहे. विशेष म्हणजे या खिताबावर गेल्या १२ वर्षात ११ वेळा मेसी आणि रोनाल्डो यांचा दावा राहिला आहे.

रॉबर्ट लेवांडोस्की गेले काही सामने अप्रतिम खेळाचे दर्शन घडवीत आहे. १० सामन्यात त्याने १५ गोल नोंदविले असून तो चँपियन लीगच अग्रणी स्कोअरर आहे. मेसीने तीन तर रोनाल्डोने चार गोल हिट केले आहेत. रॉबर्ट लेवांडोस्की ला बुंडेसालीगा मध्ये नंबर वन स्कोअरर असून त्याने तेथे उत्तम खेळाचे दर्शन घडविले आहे म्हणून त्याची फिफा पुरस्कारासाठी निवड झाल्याचे समजते.

हा सन्मान मिळविणारा रॉबर्ट लेवांडोस्की बेयर्न म्युनिखचा पाहिला खेळाडू असून पाहिला पोलंडवासी आहे. गेल्या २० वर्षात ही तिसरी वेळ आहे ज्यात हा पुरस्कार बार्सिलोना अथवा रिअल माद्रिदच्या खेळाडूला मिळालेला नाही.