नासाने शेअर केले अंतराळातून टिपलेल्या हिमालयाचे फोटो

फोटो साभार नई दुनिया

जगातील सर्वात उंच पर्वतशृंखला हिमालय जमिनीवरून गगनचुंबी दिसतो हे खरे पण अंतराळातून तो कसा दिसत असेल त्याची कुणाला खूप उत्सुकता असेल तर नासाने शेअर केलेले फोटो तुमची ही भूक, उत्सुकता मिटवू शकतील. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून एका वैज्ञानिक अंतराळवीराने काढलेले बर्फाच्छादित हिमालय पर्वतशृंखलेचे अतिशय विलोभनीय फोटो नासाने शेअर केले आहेत. मंगळवारी हे फोटो शेअर केले गेले आहेत.

या फोटोमध्ये हिमालय पर्वतरांगा दिसत आहेतच पण दिल्ली आणि लाहोर शहरातील दिव्यांचा प्रकाश सुद्धा दिसतो आहे. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या ५० दशलक्ष वर्षापूर्वी झालेल्या टकरीतून जगातील सर्वाधिक उंचीच्या हिमालय पर्वतरांगा निर्माण झाल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोना दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.