पाक गोलंदाजाने मानसिक छळाला कंटाळून घेतला हा निर्णय


इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने घेतल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. 18 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुर्लक्षित करण्यात आलेल्या वेगवान गोलंदाजाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की सध्याच्या पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनात तो खेळू शकत नाही. दरम्यान अमिरच्या निवृत्तीसंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने ब्रेक घेतल्याचे समजले जात आहे.

मोहम्मद अमिरने वर्कलोडच्या मुद्द्यांवरून मागील वर्षी जून 2019 मध्ये कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पाकिस्तानच्या संघातून न्यूझीलंडमध्ये सुरु होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बाहेर पडणे आपल्यासाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचे अमिरने म्हटले. 5 वर्षांसाठी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली होती.

मला वाटत नाही की मी क्रिकेट या व्यवस्थापनाखाली खेळत राहू शकेन. माझा मानसिक छळ होत असल्याने मी सध्या क्रिकेट सोडत आहे. मला असे वाटत नाही की यापुढे मी यातना सहन करू शकतो. माझ्याबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल टीका केली जात आहे. एक वैयक्तिक निर्णय मी घेतला आणि तो अशा चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला, जणू मला माझ्या देशासाठी खेळायचे नाही. कोणाला नाही? कधीकधी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणतात की आपण (मोहम्मद अमीर) देशाला धोका दिला. ते कधीकधी माझ्या कामाच्या बोजाविषयी बोलतात, मी कधीकधी योजनांमध्ये नसतो. हा माझ्यासाठी ‘वेक-अप कॉल’ आहे, त्यांच्या योजनांमध्ये मी नाही आणि मला बाजूला सारले पाहिजे.

पाकिस्तानकडून 17 वर्षी 2009 मध्ये आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 14 कसोटी सामन्यात 15 गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवत असताना 2010 लॉर्डस् स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यात दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. आमिरने जुलै 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि पाकिस्तान संघासाठी सामना जिंकून देण्याचे काम सुरूच ठेवले. वेगवान गोलंदाजाने एकतर्फी फायनलमध्ये भारताच्या अव्वल फळीला धूळ चारली आणि पाकिस्तानाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 विजयाचा आमिर नायक ठरला. अमिरने 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आणि 250 हून अधिक आंतरराष्ट्रीय गडी बाद केले आहेत.