लग्नाचे वचन देऊन शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नाही – उच्च न्यायालय


नवी दिल्ली – एका महिलेची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असून तिने ज्यामध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिले होते. लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कार होतो असे नसल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालायने हा निष्कर्ष महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मांडला. दिल्ली उच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान सांगितले की, लग्नाचे वचन देऊन शरीरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटले जाऊ शकत नाही, महिला जर दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत सतत शारिरीक संबंध ठेवत असेल.

याप्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी सांगितले की, पीडिता जर काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचे अमिष दाखवून ते ठेवल्याचे आपण म्हणू शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचे वचन महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकते, असेही स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर न्यायालायने असे देखील समजावून सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचे आपण म्हणू शकतो. बलात्काराच गुन्हा कलम ३७५ अंतर्गत ठरु शकतो. पण जेव्हा दीर्घ काळासाठी शारिरीक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचे सिद्ध होते.

यावेळी ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी कायम ठेवला. महिलेच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती, तिने ज्यामध्ये आरोपीने आपली फसवणूक केली असून लग्नाचे खोटे वचन देऊन शारिरीक संबंध ठेवले आणि नंतर दुसऱ्या महिलेसाठी सोडून दिले असा दावा केला होता. यावेळी महिलेने आपल्या इच्छेने शारिरीक संबंध ठेवल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालायने सांगितले.