असे आहे नीता अंबानी याचे खासगी जेट

फोटो साभार ट्विटर

आशियातील प्रथम क्रमांकाचे आणि जगात १० नंबरचे श्रीमंत रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईल साठी प्रसिद्ध आहेत. पॉवरफुल बिझिनेस वूमन असाही त्यांचा लौकिक आहे. नीता यांचे शौक त्यांच्या संपत्तीला शोभेसे आहेत. महागड्या पर्स, अलिशान गाड्या, दागिने, कपडे यामुळे त्या चर्चेत असतात तसेच त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून मुकेश यांनी दिलेले खासगी जेट सुद्धा चर्चेत असते.

२३० कोटींचे हे कस्टम फिटेड एअरबस ३१९ विमान मुकेश यांनी नीता याना ४४ व्या वाढदिवसाची भेट म्हणून दिले होते. नीता आता ५७ वर्षाच्या आहेत तरीही या विमानाची चर्चा सतत सुरु असते. पंचतारांकिंत हॉटेल मधील सुविधा फिक्या पडतील इतक्या सुखसुविधा या विमानात आहेत असे सांगितले जाते. नीता यांच्या आवडी आणि गरजा लक्षात घेऊन त्या केल्या गेल्या आहेत. विमानात डायनिंग हॉल, स्काय बार, मनोरंजन आणि गेमिंग सुविधा, म्युझिक सिस्टीम, सॅटलाईट टेलिफोन वायरलेस कम्युनिकेशन, जकुझी सह मास्टर बेडरूम आहे.

विशेष म्हणजे मुकेश बोईंग बिझिनेस जेट मधून प्रवास करतात आणि नीता याच्या खासगी जेट मधून प्रवास करण्यास प्राधान्य देतात.