पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा


नवी दिल्ली – १७ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होणार असून हा सामना अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची पहिल्या कसोटी सामन्यासाठी घोषणा बीसीसीआयने केली आहे. आपल्या ट्विटरवर बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातून सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि शुभमन गिल यांना वगळण्यात आले आहे. मयांक अगरवालसोबत सलामीसाठी पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. फॉर्मात असणाऱ्या गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघात पहिल्या कसोटी सामन्यासाठी तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. तर हनुमा विहारीच्या रुपाने एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमराह, शमी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


असा आहे भारतीय संघ – मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह