स्वदेशी इव्हे इंडियाने केल्या दोन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच

फोटो साभार नवभारत टाईम्स

स्वदेशी कंपनी इव्हे इंडियाने मंगळवारी दोन इलेक्ट्रिक स्कुटर इव्हे अॅट्रीओ व इव्हे अहवा या नांवांनी बाजारात आणल्या आहेत. सिंगल चार्ज मध्ये या स्कुटर ७० ते १०० किमीचा पल्ला गाठू शकणार आहेत. जगभरात ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली असल्याने अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन उद्योगात उतरल्या आहेत आणि त्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपन्या अग्रेसर दिसत आहेत. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

इव्हेच्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरचा लुक आणि फिचर्स शानदार आहेत. पैकी अॅट्रीओ इलेक्ट्रिकची किंमत ६४,९०० रुपये तर अहवाची किंमत ५५९०० रुपये एक्स शोरूम आहे. या दोन्ही स्कुटर दोन कलर ऑप्शन मध्ये मिळतील. अॅट्रीओ फुल चार्ज मध्ये ९० ते १०० किमीचे अंतर जाऊ शकेल तर अहवा एका फुल चार्ज मध्ये ६० ते ७० किमीचे अंतर पार करू शकेल. दोन्हीचा सर्वाधिक वेग ताशी २५ किमी आहे. या दोन्ही स्कुटरना जिओ टॅगिंग, फेन्सिंग स्मार्ट फिचर्स दिले गेले आहेत.

या दोन्ही फिचर्स मुळे स्कूटरचे रियल टाईम लोकेशन समजू शकेल तसेच स्कुटरला सुरक्षितता लाभेल. ग्राहक एका खास अॅपच्या मदतीने या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकतील. या वाहनांना एका वर्ष बॅटरी आणि पाच वर्षाची वॉरंटी दिली गेली आहे. अहवा मॉडेल साठी २५० वॉटची मोटर असून ही स्कुटर चालविण्याचा पर किलोमीटर खर्च फक्त १५ पैसे आहे.

कंपनी १० राज्यात ६० वितरकांच्या माध्यमातून वितरण करत असून पुढच्या वर्षात वितरकांची संख्या २०० वर नेली जाणार आहे. ग्राहकांना स्कुटर खरेदी सोबत एक वर्षाचा विमा दिला जाणार आहे.