फायझर लसीला मान्यता देणारा सिंगापूर पाहिला आशियाई देश

अमेरिकन औषध कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी संयुक्त स्वरुपात विकसीत केलेल्या कोविड १९ लसीला सिंगापूरने मंजुरी दिली असून या लसीला मान्यता देणारा सिंगापूर पाहिला आशियाई देश बनला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लुंग म्हणाले फायझरची लस सुरक्षित आहे. सिंगापूर मध्ये ही लस घेतलीच पाहिजे असे नागरिकांवर बंधन नाही, त्यांना हवी असेल तर लस मोफत दिली जाणार आहे. या वर्षअखेर लस सिंगापूर मध्ये उपलब्ध होणार आहे.

फायझरच्या कोविड १९ प्रतीबंधात्मक लसीला यापूर्वी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि बहारीन सरकारने मंजुरी दिली आहे. सिंगापूरची लोकसंख्या ५७ लाख आहे. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ही लस सर्व नागरिकांना मोफत मिळणार आहे. सिंगापूर सरकारने लसीकरणाची योजना बनविली असून त्यानुसार नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी लस घेणार आहेत. सर्वप्रथम सरकारी अधिकारी, आरोग्य विभाग, फ्रंटलाईन कर्मचारी, ज्येष्ठ व्यक्ती आणि आजारी लोकांचे लसीकरण केले जाणार आहे.