आयफोन १३ वेळेवर लाँच होणार

फोटो साभार युट्यूब

करोना फैलाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे अॅपल आयफोन १२ ठरलेल्या वेळेत लाँच होऊ शकला नव्हता तरी आयफोन १३ मात्र ठरलेल्या वेळेत लाँच होऊ शकतो असे संकेत प्रसिद्ध आयफोन विश्लेषक मिंग यो कुओ यांनी दिले आहेत. अॅपलचा नेक्स्ट जनरेशन आयफोन १३ पुढील उन्हाळ्यात सप्टेंबर मध्ये बाजारात दाखल होईल असा दावा त्यांनी केला आहे.

कुओ यांच्या दाव्याप्रमाणे आयफोन १३ चे उत्पादन निर्धारित योजनेनुसार सुरु होईल. कोविड १९ मुळे आयफोन उत्पादन सुरु होण्यात अडचणी आल्या होत्या आणि त्यामुळे हा फोन बाजारात येण्यास निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला होता. मात्र आयफोनचे उत्पादन कंपनी उन्हाळ्याच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणावर सुरु करेल आणि त्यामुळे सप्टेंबर मध्ये हा फोन बाजारात येईल.

आयफोन १३ आयफोन १२ प्रमाणे चार मॉडेल मध्ये सादर केला जाईल असे संकेत दिले गेले आहेत. मात्र या फोनसाठी अधिक सुधारित कॅमेरा सेटअप दिला जाईल असे बोलले जात आहे.