गुची ब्रांडने केली फॅशन दुनियेत क्रांती, आणला उलटा चष्मा

फोटो साभार मेट्रो

फॅशनच्या नावाखाली कधी कोणती स्टाईल येईल आणि बघता बघता तो ट्रेंड कधी सेट होईल याचा अंदाज करणे अवघड. फाटलेल्या, विरलेल्या जीन्स, फाटलेले स्टॉकिंग्स ही याची काही उत्तम उदाहरणे. त्यात आता जगप्रसिध्द इटालियन फॅशन ब्रांड गुचीने नवी भर घातली आहे. त्यांनी चक्क उलटा चष्मा बाजारात आणला आहे. मात्र तो ट्रेंड मध्ये येण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

हा उलटा चष्मा बघून ग्राहकांना चांगलाच शॉक बसला आहे आणि त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. विचित्र डिझाईनच्या या चष्म्याची किंमत चक्क ७५५ डॉलर्स म्हणजे ५६ हजार रुपये आहे. गुचीने या चश्म्याचे नामकरण इन्व्हर्टेड कॅट आय सनग्लासेस असे ठेवले असून ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना एका दिवसात फ्री डिलीव्हरीचे आमिष दाखविले आहे.

पन्नास ते साठच्या दशकात वरून थोडे पॉइंटेड आणि खालून गोल फ्रेमचे चष्मे खुपच लोकप्रिय होते. गुचीने याची भष्ट नक्कल करताना नवे चष्मे वरून गोल आणि खालून पॉइंटेड  बनविले आहेत. अर्थात सुरवातीपासूनच या चष्म्याची टर उडविली गेली असून सोशल मीडियावर मिम्सचा पूर आला आहे.

Loading RSS Feed