व्हेल माशाच्या उलटीमुळे रातोरात बदलले मच्छिमाराचे नशीब


थायलंड – कोणाचे नशीब कधी फळफळेल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही असाच काहीसे वृत्त आम्ही तुम्हाला दिले होते. ज्यात एका शेतकऱ्याला 200 रुपये भाड्याने घेतलेल्या जमीनीत एक दुर्मिळ हिरा सापडला होता. तशीच काहीशी घटना थायलंडमध्ये घडली आहे. तेथील एक मासेमारी करणारी व्यक्ती एक रात्रीत करोडपती झाली आहे. व्हेल माशाची उलटी या व्यक्तीच्या हाती लागली आहे, ज्यामुळे तो आता कोट्याधीश झाला आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, नारिस असे या व्यक्तीचे नाव असून व्हेलची उलटी त्याला आधी साधारण दगडाचा तुकडा वाटला होता. नंतर त्याला समजले की, त्याची किंमत २४ लाख पाउंड म्हणजे तब्बल २५ कोटी रूपये एवढी आहे. ही उलटी १०० किलो आहे. त्याचबरोबर असेही समोर आले की, हा एम्बरग्रीसचा म्हणजेच व्हेलच्या उलटीचा आतापर्यंत आढळलेला सर्वात मोठा तुकडा आहे.

मासेमारी करून महिन्याला नारिस ५०० पाउंड म्हणजे ४८ हजार रूपयांच्या आसपास कमवतो. तर आधी त्याला ही उलटी दगडाचा तुकडा वाटला होता. याला एम्बरग्रीसही म्हटले जाते. नारिसने सांगितले की, जर या उलटीची क्वालिटी चांगली निघाली तर २३, ७४० पाउंड प्रति किलो किंमत देण्याचे आश्वासन एका बिझनेसमनने दिले आहे.

एम्बरग्रीस व्हेलच्या आतड्यातून निघणारा स्लेटी किंवा काळ्या रंगाचा एक ठोस मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे. अनेकदा व्हेल ही उलटी तोंडातून काढते. हा पदार्थ व्हेलच्या शरीराभोवती त्याच्या सुरक्षेसाठी तयार होते. व्हेल समुद्र तटापासून फार दूर राहते, अशात तिच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ समुद्र किनाऱ्यावर यायला अनेक वर्ष महिने लागतात.