चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन


बीजिंग – चीनमधील एका शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला असून तेथील दुसऱ्या एका शहरामध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण जोंगने आणि सुएफिन शहरांमध्ये आढळून आले आहेत. ही दोन्ही शहर चीन आणि रशियाच्या सीमेजवळ आहेत.

जोंगनेमधील एका ४० वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जोंगनेमध्ये कोरोनाबाधित आढळल्याने नवीन नियम येथे लागू करण्यात आले आहेत. तेथील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील परिस्थिती सध्या खूप चिंताजनक आहे. आता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे. तसेच शहर सोडण्याआधी व्यक्तीला २४ तासांमध्ये कोरोना चाचणी करुन रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे हेल्थ सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.