आगामी तेजस चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट


देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या टीमने आगामी ‘तेजस’ चित्रपटाच्या निमित्ताने भेट घेतली. तसेच आपल्या चित्रपटासाठी त्यांच्याकडून कंगनाने आशीर्वाद घेतला आणि वायुसेनेकडूनही काही आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. कंगनाने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


आपल्या ट्विटर हॅंडलवर कंगनाने काही फोटो शेअर केले आहेत. ती ज्यात तिच्या टीमसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दिसत आहे. त्यासोबतच कंगनाने लिहिले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आज आशीर्वाद घेतला आणि ‘तेजस’ची स्क्रीप्ट दिली. चित्रपटाची कथा वायुसेनेसोबत शेअर केली आणि आवश्यक त्या परवानग्या त्यांच्याकडून घेतल्या. जय हिंद.

कंगना ‘तेजस’या आगामी चित्रपटात एका फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१६ मध्ये भारतीय वायुसेना महिलांना फायटर पायलट म्हणून सामिल करून घेणारी देशातील पहिली संरक्षण संस्था होती. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. सर्वेश मेवाडा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Loading RSS Feed