पगार न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लुटले iPhone, ४४० कोटीचे नुकसान


कोलार – शनिवारी कर्नाटकातील कोलारमधील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात हिंसाचार झाला. ४४० कोटी रुपयांचे यामध्ये नुकसान झाले असून हजारो आयफोन्सची लूट करण्यात आल्याचे कंपनीकडून पोलिस आणि कामगार खात्याकडे केलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

हजारो आयफोन्सची लूट हिंसाचाराच्यावेळी करण्यात आल्यामुळे प्रामुख्याने जास्त नुकसान झाले आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रकल्पात वेतन थकवल्यामुळे गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तोडफोड करण्यासोबतच दगडफेकही केली. ही कंपनी कोलार जिल्ह्यातील नारासापुरा येथे आहे. कोलार जिल्ह्यातील नारासपुरा इंडस्ट्रीयल एरियामध्ये आयफोनचा हा प्रकल्प आहे.

अन्य वस्तुंबरोबर फर्निचरचीही तोडफोड वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागच्या चार महिन्यापासून वेतन मिळाले नाही, म्हणून हे कर्मचारी आंदोलन करत होते. याप्रकरणी पोलिसांनी १२५ जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. कर्मचारी यामध्ये काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बॅटरीला आग लावण्यात आली. याशिवाय सुरक्षारक्षक आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

Loading RSS Feed